आता सिंहही होऊ शकतो राष्ट्रीय प्राणी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2015 01:44 PM IST

आता सिंहही होऊ शकतो राष्ट्रीय प्राणी

lion_24318 एप्रिल : आपल्या सिंहगर्जनेनं जंगल दणाणून सोडणार्‍या सिंहोबांना आता 'सिंहासन' मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्याच्या प्रस्तावावर मोदी सरकार विचार करत आहे. मात्र, व्याघ्रप्रेमींनी याला कडाडून विरोध केलाय.

1972 पासून वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा आहे पण झारखंडचे खासदार परिमल नाथवाणी यांनी सिंहाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव आणलाय. व्याघ्रप्रेमींनी मात्र, या प्रस्तावाला कडाडून विरोध केलाय. या प्रस्तावामुळे वाघ बचाव मोहिमेला खीळ बसेल आणि व्याघ्र अभयारण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होईल, अशी भीती पर्यावरण वाद्यांनी व्यक्त केलीय. देशात सध्या वाघांसाठी 17 ठिकाणी संरक्षित क्षेत्रं आहेत. तर सिंहासाठी फक्त संरक्षित घोषित करण्यात आलेलं आहे. 2012सालीही या नाथवानींनी सिंहाला राष्ट्रीय प्राणी बनवण्याचा प्रस्ताव आणला होता. पण तत्कालीन पर्यावरण मंत्री जयंती नजराजन यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. म्हणूनच गुजरातचे सिंह म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान मोदी आता काय करणार याकडेच प्राणीप्रेमींचं लक्षं लागलंय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2015 01:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...