आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ठार मारण्याची धमकी

आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ठार मारण्याची धमकी

  • Share this:

raghuram_rajan1-

16  एप्रिल : आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ठार मारण्याचा धमकीचा ईमेल आला आहे. दहशतवादी संघटना ISIS च्या नावाने हा ईमेल त्यांच्या खसगी ईमेल आकाऊंटवर पाठवला गेला आहे. मुंबई पोलिसांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. हा नायझेरीन टोळीचा खोडसाळपणा असू शकतो, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. पण, जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत सर्व बाजूंनी या गुन्ह्याचा तपास करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे असून मुंबई पोलिसांचे सायबर सेलचे अधिकारी याचा तपास करत आहेत.

आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना काही दिवसांपूर्वी एक ईमेल आला आहे. हा ईमेल येताच आरबीआयच्या अधिकार्‍यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या सह आयुक्तांकडे लगेचच तक्रार दाखल केली. राजन यांना हा ईमेल isis583847@gmail.com वरून पाठवण्यात आला, अशी माहिती मिळाली आहे.'तुम्हाला ठार मारण्यासाठी मला सुपारी मिळाली आहे. पण दिलेल्या सुपारीच्या पैशांपेक्षा जास्त रक्कम दिल्यास आम्ही निर्णय बदलू शकतो', असं ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

 या ईमेलबाबत सायबर क्राइम सेलच्या अधिकार्‍यांनी गुगलकडून सखोल माहिती मागवली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. रघुराम राजन यांना धमकीचा मेल आल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे असे मारिया यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या तपासात हा मेल आयडी 10 वेगवेगळ्या देशांमधून चालवला जात असल्याचे समोर आले आहे.

Follow @ibnlokmattv

First Published: Apr 16, 2015 03:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading