साध्वी प्रज्ञासिंहला जामीन मिळणार?

साध्वी प्रज्ञासिंहला जामीन मिळणार?

  • Share this:

Pragya-Singh-Thakur15  एप्रिल : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणात साध्वी प्रज्ञा आणि कर्नल श्रीकांत पुराहित यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणातील एक आरोपी वगळता साध्वी प्रज्ञा यांच्यासह अन्य आरोपींच्या जामीन अर्जावर एक महिन्याच्या आत निर्णय देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

महत्वाचं म्हणजे जामीन अर्जावर निर्णय देताना साध्वीवर लावण्यात आलेल्या 'मोक्का' कायद्याचा विचार करण्यात येवू नये, असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. या निर्णयामुळे साध्वीचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग मुख्य आरोपी आहे, पण सुप्रीम कोर्टाने साध्वी प्रज्ञा आणि कर्नल श्रीकांत पुरोहीतलाही लावलेला 'मोक्का' कायदा हटवण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी सध्या मुंबईच्या विशेष कोर्टात खटला सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

First published: April 15, 2015, 2:54 PM IST

ताज्या बातम्या