S M L

जनता परिवाराचं विलिनीकरण

Samruddha Bhambure | Updated On: Apr 15, 2015 06:47 PM IST

जनता परिवाराचं विलिनीकरण

15  एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ज्याची चर्चा होती, तो निर्णय आज (बुधवारी) औपचारिकपणे जाहीर करण्यात आला. जनता परिवार पुन्हा एकत्र आला आहे. सहा पक्षांनी पुन्हा एकत्र येऊन नवीन पक्ष स्थापन केला आहे. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी या विलिनीकरणाची घोषणा केली. भाजपचा पराभव हा या नव्या पक्षाचा मुख्य कार्यक्रम असणार आहे.

समाजवादी पक्ष, संयुक्त जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रीय लोकदल आणि समाजवादी जनता पक्ष हे सहा पक्ष एकत्र आलेत. या पक्षाचे नाव, चिन्ह, झेंडा, घटना हे सर्व पाच सदस्यीय समिती ठरवेल. राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव, राष्ट्रीय लोकदलाचे नेते ओमप्रकाश चौटाला, शरद यादव, कमल मोरारका आणि राम गोपाल हे या समितीचे सदस्य असतील. मुलायमसिंह यादव यांच्याकडे या नव्या पक्षाचे अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. त्यांच्याकडेच पक्षाच्या संसदीय मंडळाचेही अध्यक्षपद देण्यात येणार असल्याचे शरद यादव यांनी सांगितलं.


या नव्या पक्षाचं नेतृत्त्व मुलायम सिंह यादव करतील. या सहा पक्षांनी एकत्र येणं ही जनतेची मागणी होती आणि हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं मुलायम सिंह यादव यांनी म्हटलंय. तर मोदी सरकारला खाली खेचणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी देशभर जनजागृती करू, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटले. बिहार विधानसभा निवडणूक ही या नव्या पक्षाची पहिली युद्धभूमी आहे, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर 2015मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत 40 पैकी 33 जागा पटकावल्या होत्या. विधानसभेसाठी भाजप, रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समिती पक्ष यांनी आघाडी केली आहे. पण जनता परिवाराच्या विलिनीकरणामुळे बिहारमधली सगळी समीकरणं बदलणार आहेत. भाजपसमोर हा नवा पक्ष म्हणजे मोठं आव्हान असणार आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2015 06:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close