S M L

गुगलकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

Samruddha Bhambure | Updated On: Apr 14, 2015 07:59 PM IST

गुगलकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

14  एप्रिल :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 124वी जयंती आहे. आंबेडकरांना संपूर्ण भारतात अभिवादन केले जात असतानाच गुगलनेही त्यांना आदरांजली वाहिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124व्या जयंतीनिमित्त त्यांचे गुगल डुडल तयार केले आहे. गुगलने डुडलवर डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलनेही त्यांना डुडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. भारतासह हे डुडल अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि ब्रिटन या देशांतही दिसत आहे.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2015 11:31 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close