संजय राऊत यांच्या विधानाबद्दल भाजपने भूमिका स्पष्ट करावी - असादुद्दीन ओवेसी

संजय राऊत यांच्या विधानाबद्दल भाजपने भूमिका स्पष्ट करावी - असादुद्दीन ओवेसी

  • Share this:

Image img_229382_owasis_240x180.jpg13 एप्रिल : शिवसेना हा पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे सरकारने संजय राऊत यांच्या विधानाबद्दल भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी 'एमआयएम'चे नेते खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. युतीचं सरकार असल्याने सरकार त्यांच्या विधानापासून अंग झटकू शकत नाही असंही ओवेसींनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'सामना'च्या रोखठोक सदरात मुस्लीम मतांचे राजकारण थांबविण्यासाठी मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याची मागणी केली होती. त्यावर देशभरात खळबळ उडाली. काँग्रेससह मुस्लीम संघटनांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही राऊत यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा अधिकार कुणालाही नसल्याच ओवेसी यांनी म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: April 13, 2015, 5:04 PM IST

ताज्या बातम्या