10 एप्रिल : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या घरावर तब्बल 20 वर्षे पाळत ठेवल्याचं समोर आले आहे. गुप्तचर विभागाच्या कागदपत्रांतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे बोस कुटुंबियांसह देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
'मेल टुडे' या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जवाहरलाल नेहरु सरकारने जवळपास 20 वर्ष सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंबिय आणि नातेवाईकांवर पाळत ठेवली होती. 1948 ते 1968 या 20 वर्षांच्या काळात गुप्तचर विभागाकडून बोस यांच्या कोलकाता येथील निवसास्थानावर पाळत ठेवण्यात आली होती. यामध्ये बोस कुटुंबियांसह त्यांचे नातेवाईक यांच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. बोस कुटुंबियांना येणारी पत्रे आणि त्यांच्या भारतांर्गत आणि परदेशातील प्रवासाबाबतही लक्ष ठेवले जात असल्याचं या कागदपत्रांमधून उघड झालं आहे. या हेरगिरीमागे नेमकी काय कारणं होती हे जरी अस्पष्ट असलं तरी सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे शिशिर बोस आणि अमेयनाथ बोस यांच्यावर विशेष लक्ष ठेवलं जात होतं. या 20 वर्षांच्या कालावधीतील 16 वर्ष स्वत: जवाहरलाल नेहरु देशाचे पंतंप्रधान होते.
या प्रकरणी, सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी आता चौकशीची मागणी केली आहे. साधारणपणे हेरगिरी ही गुन्हेगार आणि दहशतवाद्यांवर केली जाते. बोस हे स्वातंत्र्य सैनिक होते. देशांच्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या नेताजींच्या कुटुंबियांवर अशाप्रकारीच्या पाळत ठेवल्याच्या बातम्या आल्यानं बोस कुटुंबियांसह देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप नेते यांनी या मागचं एक संभाव्य कारण व्यक्त केलं आहे. बोस यांचा मृत्यू झाला होती की नाही, याबाबत सरकारला खात्री नव्हती. 1957च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधात विरोधकांना एकवटण्याची क्षमता फक्त बोस यांच्यामध्ये होती. म्हणून कदाचित त्यांनी ही हेरगिरी केली असावी, असं अकबर यांचं म्हणणं आहे.
Follow @ibnlokmattv |