Elec-widget

धोनीला बाईक राईड पडली महागात, ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

धोनीला बाईक राईड पडली महागात, ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

  • Share this:

†¯Ö¦ü»ÖÝÖ

08 एप्रिल : टीम इंडियाचा कॉप्टन कूल महेंद्र सिंग धोनीचं बाईकप्रेम तर सर्वांनाचा माहीत आहे. पण रांचीच्या रस्त्यावरून केलेली बुलेटराईड त्याला महागात पडली आहे. बाईकवर चुकीच्या ठिकाणी नंबर प्लेट लावल्याने ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्याकडून दंड वसूल केला आहे.

चार महिन्यांचा परदेश दौरा, वर्ल्डकप या सर्वानंतर धोनी बर्‍याच दिवसांनी घरी परतला. त्यानंतर तो रांची शहरात त्याच्या बुलेटवरून फिरत होता. त्याचं फोटो मीडियातही प्रसिद्ध झाले. पण त्याच्या बुलेटच्या पुढील बाजूला नंबर प्लेट नव्हती. बाईकचा नंबर मडगार्डवर लिहीण्यात आला होता. हे लक्षात आल्यानंतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलयाचे सांगत पोलिसांनी त्याला 450 रुपयांचा ठोठावला. दंडाची पावती घरी पाठवून दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2015 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...