संकुचित मानसिकतेच्या व्यक्तींबद्दल बोलायचे नाही- सोनिया गांधी

संकुचित मानसिकतेच्या व्यक्तींबद्दल बोलायचे नाही- सोनिया गांधी

  • Share this:

sonia on giriraj

02 एप्रिल : भाजप खासदार गिरीराज सिंह यांच्या वर्णद्वेषी विधानावर प्रतिक्रिया देताना संकुचित मानसिकतेच्या व्यक्तींबद्दल बोलणे महत्त्वाचे वाटत नसल्याचा पलटवार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला.

सोनिया गांधींचा वर्ण गोरा नसता तर, काँग्रेसने त्यांना स्विकारले असते का? अशी मुक्ताफळे गिरीराज सिंह बिहारमधील पत्रकारांशी बोलताना उधळली होती. राजीव गांधींनी नायजेरियन मुलीशी लग्न केलं असते तर काँग्रेसनं तिला स्वीकारले असतं का? असा सवाल उपस्थित करून सिंह यांनी वाद ओढावून घेतला. सिंह यांच्या विधानानंतर देशभर काँग्रेस नेत्यांकडून निषेध नोंदवला जात असून सर्वच स्तरांमधून जोरदार टीका होत आहे. या वर्णद्वेषी वक्तव्याचा राग फक्त देशवासीयांपुरता मर्यादित न राहता नायजेरियाच्या भारतातील राजदूतानेही त्यावर टीका केली.

दरम्यान भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव राम माधव यांनी 'गिरिराजसिंह यांनी स्पष्टीकरण दिले, विषय संपला',असं म्हटलं होतं.

Follow @ibnlokmattv

First published: April 2, 2015, 5:01 PM IST

ताज्या बातम्या