S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

बारामुल्लामध्ये गोळीबारात 1 पोलिस हुतात्मा

Samruddha Bhambure | Updated On: Apr 2, 2015 12:56 PM IST

terror attack

02 एप्रिल : उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या हरदूशूरा भागात आज (गुरूवारी) सुरक्षा यंत्रणा आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू आहे. या गोळबारात एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे. तर एक नागरिक आणि 3 लष्करी जवान जखमी झाले आहेत.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनूसार, हारदूशूरा भागातील एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि पोलिस पथकाने संयुक्तरित्या शोधमोहिम राबविली. शोधमोहिमदरम्यान राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी हरदूशूरा गावाची नाकेबंदी केली. लष्कराचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना अतिरेक्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा यंत्रणांनी प्रत्युत्तर दिलं. पण दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी हुतात्मा झाला. तर, एक जवान आणि नागरिक जखमी झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


जवानांनी परिसराला घेराव घातला असून, दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरू आहे. दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2015 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close