01 एप्रिल : वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे भाजपचे खासदार गिरीराज सिंह यांनी यावेळी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वर्णावरून अजब तर्कट मांडले आहे. सोनिया गांधींचा वर्ण गोरा नसता तर, काँग्रेसने त्यांना स्विकारले असते का? अशी मुक्ताफळे गिरीराज सिंह यांनी उधळली आहेत. बिहारमधील स्थानिक पत्रकारांनी राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर गिरीराज सिंह यांना प्रश्न विचारला होता. याबाबत बोलताना गिरीराज यांनी बेताल वक्तव्य केले.राजीव गांधींनी नायजेरियन मुलीशी विवाह केला असता तर काँग्रेसने तिला स्वीकारले असतं का? या वक्तव्यातून गिरीराज सिंह यांचा रोख सोनिया गांधी यांच्यावर होता. सोनिया गांधी या गोर्या असल्याने त्यांना काँग्रेसने अध्यक्ष म्हणून स्वीकारले असं गिरीराज सिंह यांचे म्हणणं होते.या वर्णद्वेषी वक्तव्याबद्दल विरोधी पक्षांनी आणि महिला संघटनांनी गिरीराज सिंगांना फटकारलं आहे. काँग्रेसनेही गिरीराज यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. भाजपने आपली मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं सांगत केंद्रीय मंत्र्यांने महिलांच्या वर्णावरुन असं बेजबाबदार विधान करणं दुदैर्वी असून गिरीराज सिंह यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. तर, पंतप्रधान मोदींनी गिरीराज यांना अशाप्रकारची विधानं करण्यासाठीत मंत्रीमंडळात स्थान दिले असल्याचा टोला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे.तर दुसरीकडे गिरीराज यांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नसल्याचं स्पष्ट करत भाजपने स्वत:ला वादापासून दूर ठेवलं आहे.दरम्यान, या सर्व टीकांनंतर गिरीराज यांनी खेद व्यक्त केला आहे. मी जे बोललो ते खाजगीमध्ये होतं, ऑफ द रेकॉर्ड होतं... मात्र माझ्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखावलं असेल तर मी खेद व्यक्त करतो अशी सारवासारव गिरीराज सिंग यांनी केली आहे.Follow @ibnlokmattv// !function(d,s,id){var js,fjsd.getElementsByTagName(s)[0],p/^http:/.test(d.location)?http:https;if(!d.getElementById(id)){jsd.createElement(s);js.idid;js.srcp://platform.twitter.com/widgets.js;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, script, twitter-wjs);// ]]>