भूसंपादन विधेयक शेतकर्‍यांच्या हिताचच - पंतप्रधान

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2015 03:58 PM IST

modi man ki baat

22  मार्च : भूसंपादन विधेकाला विरोध करून विरोधक देशाच्या विकासात अडथळे निर्माण करत असून नव्या भूसंपादन विधेयकावरून शेतकर्‍यांची दिशाभूल केली जात आहे. काँग्रेसने घाईगडबडीत आणलेल्या भूसंपादन विधेयकात नव्या सरकारने सुधारणा करून त्यात शेतकर्‍यांच्या हिताच असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून शेतकर्‍यांना दिली. नवे भूसंपादन विधेयक मंजूर झाल्यास शेतकर्‍यांचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वासही मोदींनी या वेळी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेडिओवरून 'मन की बात' या कार्यक्रमातून देशातील शेतकर्‍यांसोबत संवाद साधला. केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी असून, देशाच्या विकासाठी भूसंपादन विधेयक किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी शेतकर्‍यांना पटवून दिले. त्याचबरोबर देशात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना लवकरच शासकीय मदत मिळवून देणार असल्याचे ठोस आश्वासन दिले. अपेक्षे प्रमाणे मोदींनी भूसंपादन विधेकावर शेतकर्‍यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांच्या हिताचे संरक्षण करण्याची तरतूद केलेल्या भूसंपादन विधेयकावरून विरोधकांनी शेतकर्‍यांची मोठी दिशाभूल केल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला.

देशात गेल्या 60-65 वर्ष जुना भूसंपादन कायदा आस्तित्वात आहे. युपीएच्या काळात आलेल्या भूसंपादन विधेयकात आम्ही अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे शेतकर्‍यांना भूसंपादनानंतर पूर्वीपेक्षा चारपट मोबदला देण्याबरोबर शेतकर्‍यांच्या हिताच्या 13 नव्या तरतुदींचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. शहरीकरणासाठी संपादित करण्यात येणार्‍या शेत जमिनीपैकी 20 टक्के जमिन मूळ शेतकर्‍यांच्या नावावर राहिल, त्यामुळे त्याला कायम स्वरूपी फायदा मिळण्याची सोय झाली आहे. शेतकरी आणि शेतमजुराच्या मुलांना नोकर्‍या. सर्वात आधी सरकारी जमिन, त्यानंतर पडीक आणि फारच गरज भासल्यास तसेच अन्य कोणताही पर्याय नसल्यासच बागायती जमिनीचे संपादन करण्याची तरतूद या नव्या कायद्यात करण्यात आली आहे. एकुणच सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचाच विचार केला असल्याने या विधेकाच्या मंजुरीने भारतातील शेतकर्‍यांचा फायदा होणार असल्याचा विश्वास मोदींनी या वेळी व्यक्त केला.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2015 12:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...