दिपक निकाळजेचा प्रचार करू नका- छोटा राजन

5 ऑक्टोबर चेंबूर मतदारसंघातून छोटा राजन या अंडरवर्ल्ड डॉनचा भाऊ दीपक निकाळजे तिसर्‍या आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. दिपक निकाळजे यांनी निवडणुकीच्या राजकारणात पडण्यास छोटा राजनचा विरोध आहे . त्यामुळेच अनेक कार्यकर्त्यांना निकाळजे यांचा प्रचार न करण्यासाठी थेट अंडरवल्डकडून धमक्या येत आहेत. या धमक्याने काही कार्यकर्ते घाबरले असल्याची चर्चा आहे. तर ट्राम्बे-सायन रस्त्यावरच्या आंबेडकर नगर मधील कार्यकर्ता रमेश घोक्षे यांना थेट परदेशातून फोनवरून धमकी देण्यात आली . 14 ते 29 सप्टेंबर दरम्यान अनेकदा फोन आला. त्याची तक्रारही चेंबूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दिपक निकाळजे काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात निवडणुक लढवत असल्याने काँग्रेस आपल्याला नंतर त्रस देईल, या भितीनेच छोटा राजन अश्या प्रकारच्या धमक्या देत असल्याच बोललं जात आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2009 01:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...