S M L

गांधी जयंतीची सुटी कायम, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Samruddha Bhambure | Updated On: Mar 15, 2015 08:31 PM IST

गांधी जयंतीची सुटी कायम, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

15 मार्च : गोवा- गांधी जयंतीच्या सुटीवरून झालेल्या गोंधळाबद्दल आता गोवा सरकारने ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. या आधी गोवा भाजपच्या अध्यक्षांनी पण ही प्रिंटिंग मिस्टेक अल्याचं सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

गोवा सरकारने 2015 वर्षासाठी जाहीर केलेल्या सुट्यांच्या यादीत 2 ऑक्टोबर या दिवसाचा 'नॅशनल हॉलिडे' म्हणूृन उल्लेख न करता 'वर्किंग डे' म्हणून दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून काँग्रेसने सत्ताधार्‍यांच्या या निर्णयावर जोरदार टीका केली.त्यानंतर गोवा सरकारनं ही प्रिंटिंग मिस्टेक किंवा कोणीतरी जाणूनबुजून खोडसाळपणे ही चूक केली असावी असा दावा केला. पण जेव्हा ही बातमी उघडकीस आली तेव्हा संघाच्या काही कार्यकर्त्यांनी सुटी न देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. आरएसएसचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी देशात अशा सुट्या कमी करणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर, गोव्यातल्या सध्याच्या सरकारनं नथुराम गोडसे यांच्या जन्मदिनी सुटी द्यायला नको, असा खोचक टोलाही काँग्रेसनं लगावला होता.

Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2015 06:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close