S M L

नन बलात्कार प्रकरणी पाच जण ताब्यात

Samruddha Bhambure | Updated On: Mar 15, 2015 04:33 PM IST

नन बलात्कार प्रकरणी पाच जण ताब्यात

15 मार्च :  पश्चिम बंगालमध्ये 71 वर्षीय ननवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना काल (शनिवारी) घडली आहे. या प्रकरणी आज (रविवारी) पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पीडित ननवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

रानाघाट उपमंडळाच्या स्थानिक कॉन्व्हेंट स्कूलच्या अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साधारण बारा वाजण्याच्या सुमारास एका टोळक्याने स्कूलमध्ये प्रवेश केला, टोळक्यामध्ये तीन ते चार लोक होते. ननला त्रास देऊन ननवर सामूहिक बलात्कार केला.


बलात्कार केल्यानंतर स्कूलमध्ये असलेल्या कपाटातील 12 लाख रुपयेही लंपास केले. शनिवारी सकाळी जेव्हा स्कूलच्या अधिकार्‍यांना हा धक्कादायक प्रकार समजला, तेव्हा त्यांनी ननला तातडीने रानाघाट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या अत्यवस्थ आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या दृष्टिने तपास करण्यात येत असून पाच जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याशिवाय पोलिसांनी आरोपीबाबत माहिती देणार्‍यास एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

या भयानक घटनेबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुन्हेगारांना कडक शिक्षा केली जाईल असं सांगत या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

दरम्यान, 'घर वापसीच्या नावाने राज्यात धार्मिक राजकारण करण्यात येत असून धार्मिक कट्टरता राज्यात वाढत आहे,' असे तृणमूल काँग्रेसच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2015 03:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close