राहुल गांधींच्या हेरगिरीमुळे काँग्रेसची सटकली

  • Share this:

rahul gandhi in mahad14 मार्च : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हेरगिरी प्रकरणामुळे मोठा वादंग निर्माण झालाय. या प्रकारामुळे काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला असून या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यालयाकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. तर भाजपने सर्व आरोप फेटाळून लावले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी हातवर केले असून हेरगिरी केलीच नाही असा दावा केला.

गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांचे एक पथक राहुल गांधी यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केल्याचं वृत्त आहे. त्यावेळी पोलिसांनी कार्यालयात उपस्थित असणार्‍या लोकांना राहुल गांधी दिसायला कसे आहेत, त्यांच्या केसांचा, डोळ्यांचा रंग, वय आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय अशी चौकशी केली होती. काँग्रेसने दावा केला आहे की, दिल्ली पोलीस एएसआई शमशेर सिंह यांनी ही चौकशी केली होती. यावर काँग्रेसने चांगलाच संताप व्यक्त केलाय. हे गुजरातचं मॉडेल असू शकतं अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केलीये. दरम्यान, आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या घरासमोर निदर्शनं केली. यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली. आंदोलन करणार्‍या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मात्र, या अगोदरही व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त लालकृष्ण अडवाणी यांच्यासह इतर नेत्यांच्या घरीही पोलिसांची टीम गेली होती असा खुलासा पोलीस आयुक्त बीएस बस्सी यांनी केला. परंतु राहुल यांची हेरगिरी केली हा दावा बस्सी यांनी खोडून काढला. परंतु, काँग्रेसने यावर आक्रमक भूमिका घेतली असून सोमवारी संसदेत सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 14, 2015 08:16 PM IST

ताज्या बातम्या