मनमोहनसिंग यांच्या समर्थनात काँग्रेसची पदयात्रा

मनमोहनसिंग यांच्या समर्थनात काँग्रेसची पदयात्रा

  • Share this:

sonia gandhi march

12 मार्च : कोळसा घोटाळा (कोलगेट) प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव आल्याने, आज (गुरुवारी) त्यांच्या समर्थनात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी पदयात्रा काढली.

सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी 24, अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयापासून मनमोहनसिंग यांच्या घरापर्यंत ही पदयात्रा काढली. या पदयात्रेपूर्वी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी समितीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे खासदार आणि सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. मनमोहनसिंग यांच्या बाजूने लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीला मनमोहनसिंग उपस्थित नव्हते.

काँग्रेस पक्ष एकत्र येऊन पूर्णपणे मनमोहनसिंग यांच्यासोबत असल्याचं यावेळी पत्रकारांशी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या. 'मनमोहनसिंग यांच्या प्रामाणिकपणावर कोणी प्रश्न उपस्थित करू शकत नाही. या प्रकरणाचा आम्ही कायदेशीररित्या लढाई लढणार आहोत. मला विश्वास आहे, की ते नक्की निर्दोष सिद्ध होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर, अम्हाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केला आहे.

कोलगेट प्रकरणी बुधवारी विशेष न्यायालयाने मनमोहनसिंग यांच्या विरोधात समन्स जारी केले. सिंग यांच्या बरोबर उद्योजक कुमार मंगलम बिर्ला, कोळसा मंत्रालयाचे तत्कालिन सचिव पी. सी. परख आणि हिंदाल्को समूहाच्या अन्य तीन अधिकार्‍यांविरोधातही समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात मनमोहनसिंग यांना आरोपी म्हणून 8 एप्रिल रोजी न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.

Follow @ibnlokmattv

First published: March 12, 2015, 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading