भूसंपादनाबाबत शिवसेनेची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच !

भूसंपादनाबाबत शिवसेनेची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच !

  • Share this:

uddhav on modi_land_bill10 मार्च : भूसंपादन विधेयकावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद दिवसेंदिवस वाढतच चाललाय. भूसंपादनाबाबत आज  शिवसेनेच्या खासदारांची नवी दिल्लीत बैठक घेतली. पण या बैठकीत ठोस असा कोणताही निर्णय झाला नसून सेनेची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. भूसंपादन विधेयकाबद्दल शिवसेना योग्य वेळी भूमिका जाहीर करणार, असं या बैठकीत ठरलंय. शिवसेना अगदी शेवटच्या क्षणी भूमिका जाहीर करेल, असं दिसतंय.

शिवसेना खासदारांची दिल्लीत बैठक झाली त्या बैठकीला शिवसेना नेते सुभाष देसाईही हजर होते. भूसंपादन विधेयकातल्या काही अटींना शिवसेनेचा ठाम विरोध आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते व्यंकय्या नायडूंचा उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली. पण, अजूनही सेनेनं यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी भूसंपादनाला जाहीरपणे विरोध दर्शवला असून या विधेयकाच्या विरोधात आक्रमक होण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहे. सोमवारीच, सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत सेनेची बाजू मांडली होती. आणि आज त्यानंतर बैठक घेण्यात आलीये. सेनेच्या विरोधामुळे भाजपची चांगलीच कोंडी झालीये. त्यामुळे ऐनवेळी शिवसेना काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

First published: March 10, 2015, 5:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading