बंदी नंतरही बीबीसीकडून 'त्या' डॉक्युमेंटरीचं प्रसारण !

बंदी नंतरही बीबीसीकडून 'त्या' डॉक्युमेंटरीचं प्रसारण !

  • Share this:

GANG-RAPE-sl-21-12-201205 मार्च :  निर्भया प्रकरणावर बीबीसीनं तयार केलेली डॉक्युमेंटरी एक दिवस आधीच यूकेमध्ये दाखवण्यात आलीय. भारतीय वेळेनुसार आज पहाटे साडे तीन वाजता ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. या डॉक्युमेंटरीवर भारत सरकारनं बंदी घातली होती. डॉक्युमेंटरीवर काल राज्यसभेत यावरून गदारोळही झाला होता. त्यानंतर या डॉक्युमेंटरीचं प्रसारण होऊ देणार नाही, असं आश्वासन केंद्र सरकारने दिलं होतं. मात्र तरीही निर्भयाची डॉक्युमेंटरी प्रसारित झाली.

इंग्लंडमधल्या स्थानिकवेळेनुसार बुधवारी रात्री 10 वाजता बीबीसी फोरने या डॉक्युमेंटरीचं प्रसारण केलं. प्रसारण न करण्याची सूचना केल्यानंतरही या डॉक्युमेंट्रीचं प्रसारण केल्यामुळे केंद्र सरकार बीबीसीविरुद्ध कारवाई करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्वनियोजित वेळेनुसार येत्या 8 मार्च रोजी या डॉक्युमेंटरीचं प्रसारण करण्यात येणार होते. मात्र, बीबीसीने आपला निर्णय बदलून आधीच त्याचे प्रसारण केले.

ही मुलाखत घेणार्‍या फिल्ममेकर लेस्ली उडविन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा विचार आहे. तुरुंगात जाऊन ही मुलाखत घेण्याबाबत ज्या अटी आणि शर्ती घालून दिल्या होत्या, त्याचं उल्लंघन झाल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. त्यामुळे गृहमंत्रालय फिल्ममेकर लेस्ली उडविन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

Follow @ibnlokmattv

First Published: Mar 5, 2015 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading