'निर्भया' डॉक्युमेंटरीचं प्रसारण होऊ देणार नाही -राजनाथ सिंह

'निर्भया' डॉक्युमेंटरीचं प्रसारण होऊ देणार नाही -राजनाथ सिंह

  • Share this:

rajanth on rape

04 मार्च :   दिल्लीत 16 डिसेंबर 2012 मध्ये झालेल्या 'निर्भया' बलात्कार प्रकरणावर बीबीसीने केलेली डॉक्युमेंटरी ही भारतासाठी लज्जास्पद बाब असून, या डॉक्युमेंटरीचे प्रसारण होऊ देणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज (बुधवारी) राज्यसभेत सांगितलंय.

बीबीसी वाहिनीचे निर्माते आणि निर्देशक लेज्ली उडविन यांनी या प्रकरणावर डॉक्युमेंटरी तयार केलीये. या डॉक्युमेंटरीसाठी त्यांनी तिहार जेलमध्ये जाऊन दोषी मुकेशची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत दोषीने निर्भयावर अनेक खळबळजनक आरोप केले होते. त्यामुळे या प्रकरणावरून गदारोळ उडाला असून, राज्यसभेत यावर आज सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागलं. आरोपीची मुलाखत घेण्यासाठी परवानगी कशी काय देण्यात आली, यावर प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. जागतिक महिला दिनानिमित्तही डॉक्यमेंटरी बीबीसीवर आज आणि एनडीटीव्हीवर 8 मार्चला दाखवली जाणार होती. पण, आता सरकारने याचं प्रसारण रोखणार असल्याचं स्पष्ट केलंय.

याविषयी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, की या डॉक्युमेंटरीचे शुटिंग करण्यासाठी काही अटींच्या आधारावर परवानगी देण्यात आली होती. या प्रकरणी पूर्ण चौकशी करण्यात येईल आणि दोषींना शिक्षा करण्यात येईल. माध्यमांमध्ये कुठेही या डॉक्युमेंटरीचे प्रसारण सरकार होऊ देणार नाही.

या प्रकरणावरून राज्यसभेतील सदस्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गीतकार जावेद अख्तर म्हणाले, की बरे झाले, ही डॉक्युमेंटरी बनविण्यात आली. यामुळे आपल्याला कळेल की, बलात्कारी व्यक्तीविरोधात नागरिक काय विचार करतात. तर, खासदार जया बच्चन यांनी या प्रकरणात कारवाईसाठी सरकार उशीर करत असल्याचा आरोप केला.

Follow @ibnlokmattv

First published: March 4, 2015, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading