निर्लज्जपणाचा कळस, 'निर्भया'नं प्रतिकार केला नसता तर वाचली असती !

निर्लज्जपणाचा कळस, 'निर्भया'नं प्रतिकार केला नसता तर वाचली असती !

  • Share this:

nirbhya case303 मार्च : भारताला हादरावून सोडणार्‍या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीने निर्लज्जपणाचा कळस गाठलाय. घटनेच्या वेळी निर्भयाने प्रतिकार केला नसता तर ती वाचली असती असं निर्लज्ज आणि उद्दाम उत्तर आरोपी मुकेश सिंहने दिलंय. त्याच्या या धक्कादायक उत्तरामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

'लेस्ली उडविन' या परदेशी फिल्ममेकरनं 'निर्भया'वर 'इंडियाज डॉटर'ही डॉक्युमेंटरी तयार केलीये. त्यासाठी त्यांनी तिहार तुरुंगात जाऊन 2012 साली दिल्ली घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश सिंहची मुलाखत घेतली. निर्भया रात्री उशिरा घराबाहेर होती, त्यामुळे आम्ही तिला धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केलं असे तारे मुकेश सिंहनं तोडलेत. इतकंच नाही तर निर्भयानं प्रतिकार केला नसता तर आम्ही तिला मारहाण केली नसती, आम्ही तिच्या मित्राला मारहाण करून आमचं काम उरकून निघून गेलो असतो असं निर्लज्ज उत्तरही त्याने दिलं. त्याच्या या विधानांमुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 'इंडियाज डॉटर' ही डॉक्युमेंटरी बीबीसी या वृत्तवाहिनीवर दाखवली जाणार आहे. ही फिल्म तयार करताना मुकेश सिंहची स्त्रियांविषयीची मानसिकता बघायला मिळाली आणि ती अतिशय धक्कादायक होती असं उडविन यांनी आज दिल्लीमध्ये एका पत्रकार परिषदेत म्हटलंय. हा फक्त एकट्या मुकेशची समस्या नाही तर ही सामाजिक समस्या आहे असं मतही उडविन यांनी व्यक्त केलंय. 16 डिसेंबर 2012 रोजीच्या रात्री निर्भया आणि तिचा मित्र सिनेमा पाहून घरी जात होते. त्यावेळी एका बसमध्ये बसले असता ड्रायव्हरसह सहा नराधमांनी तिच्यावर अमानुष बलात्कार केला होता. या प्रकरणी चार नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

First published: March 3, 2015, 10:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading