S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

पर्यटनाची चकाचक घोषणा पण खिसा तुमचा खाली !

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2015 10:26 PM IST

पर्यटनाची चकाचक घोषणा पण खिसा तुमचा खाली !

28 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटमध्ये पर्यटन क्षेत्राच्या सुधारणावर भर देणार असल्याचं जाहीर केलं खरं पण इथं जेटली एका हाताने दिलं आणि दुसर्‍या हाताने परत घेतलं असंच केलंय. भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि  'हेरिटेज' म्हणजेच ऐतिहासिक वारसा असलेल्या क्षेत्रांचा विकास करण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने यंदाच्या बजेटमध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. पण हॉटेल, पर्यटन महाग करून नेमकं काय साधलं असा सवाल उपस्थित झालाय.

मुंबईतील एलिफंटा लेणीसह भारतातील 25 वर्ल्ड हेरिटेज स्थळांच्या सुधारणांवर भर देणार असल्याचं जेटलींनी स्पष्ट केलंय. यामध्ये प्राचीन स्थळांचं जिर्णोद्धार, सुचना फलक, पार्किंगची सुविधा, अपंग व्यक्तींसाठी सोई-सुविधा, तसंच सुरक्षा आणि टॉयलेटससारख्या पायाभूत सुविधा या सर्व ठिकाणी उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं या बजेटमध्ये जेटलींनी म्हटलंय. यावेळी, वाराणसी, हैदराबाद आणि अमृतसरच्या ठिकाणांना 'वर्ल्ड हेरिटेज'चा दर्जा देण्यात येईल, असंही जेटली यांनी जाहीर केलं आहे. त्याचं 150 देशांना 'व्हिजा ऑन अरायव्हल' उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.

हातसफाई कशी ?


जेटली यांनी पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेतला खरा पण तुम्ही जर यातील एखाद्या पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी जाणार असला तर अगोदर पर्यटनासाठी असणार्‍या सर्व सोयींच्या खर्चात वाढ करण्यात आलेली असेल. तुमच्या एंजटकडून तिकीट मागवण्यापासून ते हॉटेलमध्ये जेवणं करणं,राहणं याचा खर्च वाढवण्यात आलाय. आता पर्यटनस्थळी गेल्यावर खरेदी आलीच. आणि जर तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डने जर खरेदी करत असणार तर तेही महाग पडणार आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की, पर्यटनाला एकीकडे चालणा आणि दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिश्यातून पाहण्याचा पैसाही वसूल करण्यात येणार आहे.

या क्षेत्रांचा विकास आराखड्यात समावेश

- जुन्या गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेन्टस्

- मुंबईतल्या एलिफंटा गुंफा

 

- कर्नाटकातील हम्पी

- कुंभालगड आणि राजस्थानमधले आणखीन काही किल्ले

- रानी की वाव, पतन, गुजरात

- लेह पॅलेस, लडाख, जम्मू-काश्मीर

- वाराणसी टेम्पल टाऊन, उत्तरप्रदेश

- जालियनवाला बाग, अमृतसर, पंजाब

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2015 04:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close