काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला तुर्तास दिलासा

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला तुर्तास दिलासा

  • Share this:

989salman_khan

25 फेब्रुवारी : काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या भवितव्याचा फैसला पुढे ढकलण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 3 मार्च रोजी होणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे सलमान खानला काहीसा दिलासा मिळाला आहे. प्रलंबित अर्जांवर आधी सुनावणी करावी, अशी मागणी सलमानच्या वकिलांनी केली होती. ही मागणी मान्य केल्याने काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी आता 3 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

काळवीट शिकारप्रकरणी अंतिम सुनावणी जोधपूरमधील सेशन कोर्टात आज (बुधवारीय) होणार होती. पण सलमान खानच्या वकिलांनी कोर्टाकडे केलेल्या अर्जांवर आधी सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानुसार येत्या 3 मार्चला या अर्जांवर सुनावणी घेण्यात येणार आहे.

1998 मध्ये 'हम साथ साथ है', या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने राजस्थानमध्ये अवैध हत्यारांनी काळवीटाची शिकार केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी राजस्थानच्या जोधपूर सेशन्स कोर्टाने सलमानला दोषी ठरवून त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र राजस्थान हायकोर्टाने या शिक्षेला स्थगिती दिल्याने सलमान खानला मोठा दिलासा मिळाला होता. या निर्णयाला राजस्थान सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यानंतर हे प्रकरणी सुप्रीम कोर्टात गेलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने सलमान खानच्या याचिकेवर हायकोर्टाने पुनर्विचार करून अंतिम निर्णय घ्यावा असे सांगत हे प्रकरण पुन्हा स्थानिक कोर्टाकडे पाठवले आहे. त्यावर आज सुणावणी होणं अपेक्षित होतं. मात्र आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तसंच, सलमान खानने आजही कोर्टात गैरहजर राहण्यासाठी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज कोर्टाने मंजूर केला. दरम्यान, याप्रकरणी सलमान जर दोषी आढळला तर त्याला 3 ते 4 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

First published: February 25, 2015, 1:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading