S M L

स्वाइन फ्लूचे देशात 800 बळी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 24, 2015 08:29 PM IST

swaine flu 23

24 फेब्रुवारी :  देशभरात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या 800 वर गेली आहे. सुमारे दहा हजार लोकांना याची लागण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (मंगळवारी) दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी याविषयीचं निवेदन संसदेच्या दोन्ही सभागृहांत सादर केलं. त्यामुळे या आजाराचा फैलाव कमी झाल्याची चिन्हे अजिबात नाहीत.

'स्वाइन फ्लूच्या औषधांचा तुटवडा होतं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी फेटाळून लावला आहे. प्रत्येक राज्यात स्वाईन फ्लूशी लढण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत केंद्राकडून देण्यात येत असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.दरम्यान गुजरातमध्ये स्वाईनफ्लूचे आणखीन 12 बळी गेल्याने तिथल्या बळींची संख्या 219वर गेली आहे. तर काश्मीरमध्ये 150 जणांना आतापर्यंत स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत 33 मृत्यू झाले असून तेलंगणामध्ये काल 47 नवीन रूग्ण दाखल झालेले आहेत.

Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2015 08:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close