केजरीवाल आज अण्णांच्या सोबत व्यासपीठावर ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 24, 2015 10:14 AM IST

केजरीवाल आज अण्णांच्या सोबत व्यासपीठावर ?

keriwal and anna24 फेब्रुवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लाक्षणिक उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. अण्णा दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणं आंदोलन करतायत. हे 2 दिवसीय आंदोलन आज संपण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आज अण्णांचे 'हनुमान' समजलेले जाणारे माजी सहकारी अरविंद केजरीवाल आज व्यासपीठावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन कायद्याच्या अध्यादेशाविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले. हा अध्यादेश शेतकरीविरोधी आणि उद्योगपतींच्या बाजूचा आहे असा आरोप होतो आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांच्यासोबत देशभरातल्या 22 शेतकरी संघटनाही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तसंच सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर याही आंदोलनात सहभागी झाल्यात. सोमवारी दिल्लीत या आंदोलनाला सुरूवात झालीये. अण्णाचे माजी सहकारी आणि आताचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांची भेट झाली. केजरीवाल यांनी महाराष्ट्र सदनामध्ये जाऊन अण्णांची भेट घेतली. केजरीवाल दुसर्‍यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट झालीये. या भेटीत अण्णांनी केजरीवाल यांना व्यासपीठावर येण्याचं आमंत्रण दिलंय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2015 10:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...