20 फेब्रुवारी : बिहारमध्ये राजकारण चांगलचं तापलं आहे. मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मांझी यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
बिहारमध्ये सुमारे दोन आठवड्यांपासून हा सत्तासंघर्ष पेटलेला आहे. भाजपने नितिश कुमार यांना शह देण्यासाठी मांझी सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केलं होतं. जीतनराम मांझी आणि नितीश कुमार दोघांनीही सुरुवातीला आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता. त्यावर आज विधानसभेत शिक्कामोर्तब होणार होते. पण त्याआधीच मांझी यांनी राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणून जीतनराम मांझी यांची अत्यंत छोटी पण वादग्रस्त कारकीर्द ठरली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाची जबाबदारी स्विकारत नितीश कुमार यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर मांझी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सुत्रे सोपवण्यात आली होती.
दरम्यान, थोड्या वेळात मांझी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यातच मांझी राजीनाम्याचं कारण स्पष्ट करतील.
Follow @ibnlokmattv |