मांझींच्या 'जहाजा'ला भाजपचा 'टेकू' !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2015 11:14 AM IST

manjhi_650_09121412372519 फेब्रुवारी : बिहारमध्ये राजकीय नाट्याला आता वेगळं वळण मिळालंय. बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या डुबत्या जहाजाला भाजपने 'टेकू' दिलाय. भाजपने मांझी यांना समर्थन देणार असल्याची घोषणा केलीये. भाजपच्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. त्यामुळे आता उद्या (शुक्रवारी) मांझी बहुमत सिद्ध करणार आहे.

बिहार विधानसभेत भाजपचे 87 आमदार आहेत. मांझी यांना आपली खुर्ची आणि सरकार वाचवण्यासाठी बहुमताची परीक्षा द्यावी लागणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून मांझी आणि नितीशकुमार यांच्यातला संघर्ष टोकाला पोहचलाय. मांझी यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचण्याचा चंगच नितीशकुमारांनी मनाशी बांधलाय. पण आता याला आज वेगळं वळण मिळालंय. भाजपने मांझींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. उद्या बहुमताच्या वेळी भाजपचे आमदार मांझींच्या बाजूने मतदान करतील. भाजप नेते सुशील मोदी यांनी याबद्दल स्पष्ट खुलासा केलाय. संपूर्ण बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे आम्ही सर्व आमदारांनी मिळून मांझींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असं सुशील मोदींनी सांगितलंय. तर दुसरीकडे नितीशकुमार यांनी आपल्या समर्थकांना स्नेहभोजन देऊन शक्तीप्रदर्शन केलंय. त्याला उत्तर देण्यासाठी मांझींनीही आपल्या समर्थकांसाठी स्नेहभोजन आयोजित केलंय. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष उदयनारायण चौधरी यांनी जेडीयूला विरोधीपक्षनेतेपदाचा दर्जा दिलाय. भाजपच्या निर्णय रद्द ठरवत विधानसभा अध्यक्षांनी जेडीयूचे नेते विजय चौधरी यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड केलीये. भाजपने याला विरोध केला होता. पण त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही. आपल्या हातून विरोधीपक्षनेतेपद गेल्यामुळे भाजपने अध्यक्षांच्या चेंबर बाहेर निदर्शनं केली होती. विशेष, म्हणजे उद्यासाठी सर्व पक्षांनी आमदारांना व्हिप जारी केले आहे. उद्या मतदान करण्यापासून जनता दल संयुक्तच्या 8 बंडखोर आमदारांना पाटणा हायकोर्टाने बंदी घातलीये.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2015 11:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...