S M L

मोदींकडून शिवरायांना मानाचा मुजरा!

Samruddha Bhambure | Updated On: Feb 19, 2015 10:10 AM IST

मोदींकडून शिवरायांना मानाचा मुजरा!

19 फेब्रुवारी :  शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांचं स्मरण केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रमावर भारताला गर्व असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. शिवजयंतीनिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. शिवाजी महाराज हे देशाची शान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.Loading...
Loading...

शिवाजी महाराज युद्धभूमीवर तेजस्वीपणे तळपले आणि त्यांनी प्रशासनाचाही आदर्श घालून दिला. सुशासनाच्या माध्यमातून त्यांनी जनतेचं भलं केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत असल्याची भावना ही मोदींनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.

 

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देताना भाषण केलं होते. मोदींनी आपल्या या रायगड दौर्‍याचंही स्मरण केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2015 09:58 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close