'आप सरकार'चा शपथविधी दिवसभरातील संपूर्ण अपडेट्स

'आप सरकार'चा शपथविधी दिवसभरातील संपूर्ण अपडेट्स

  • Share this:

kejriwal14 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत विक्रमी यशानंतर आज आम आदमी पार्टीचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. 'आप'च्या विजयाचे शिल्पकार अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये.त्यांच्यासह सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये मनीष सिसोदिया यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीये. विशेष म्हणजे मागील वर्षी 14 फेब्रुवारी रोजी केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आणि आता वर्षभरातनंतर केजरीवाल पुन्हा याच दिवसाची त्यांनी निवड केली. आम आदमी सरकारच्या राज्याभिषेक सोहळ्याची दिवसभरातील अपडेट्स....

केजरीवाल सरकारची पहिली मंत्रिमंडळाची बैठक लांबणीवर

केजरीवाल यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

- माझे कार्यकर्ते हिरे आहे -केजरीवाल

- भारतीय टीम यावेळीही वर्ल्डकप जिंकून येईल, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो -केजरीवा

- पक्षासाठी अनेकांनी नोकर्‍या सोडल्यात, पडद्याआड असलेल्या कार्यकर्त्यांची मेहनत हे आजच यश आहे – केजरीवाल

- किरण बेदींचा मी खूप सन्मान करतो -केजरीवाल

- किरण बेदी माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत -केजरीवाल

- किरण बेदी , अजय माकन यांचं आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेणार आहोत -केजरीवाल

- आम्हांला ही पार्टी ती पार्टी असं न करता दिल्लीला एक आगळंवेगळं शहर बनावायचंय -केजरीवाल

- सरकारी गाडी घेणार, कार्यालय घेणार जर घेतलं नाही तर कामं कसं करणार ? – केजरीवाल

- एखादा मंत्री रस्त्यावरून जात असताना वाहतूक बंद केली जाते हे अयोग्य आहे -केजरीवाल

- व्यापार्‍यांनो तुम्ही बिनधास्त व्यापार करा, पण सर्व टॅक्स भरा -केजरीवाल

- दिल्लीत व्हिआयपी संस्कृती बंद करणार -केजरीवाल

- दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवणार -केजरीवाल

- पंतप्रधान तुम्ही देश चालवा, मी दिल्ली चालवतो -केजरीवाल

- दिल्लीत लवकरच जनलोकपाल विधेयक मंजूर करणार -केजरीवाल

- आम्हाला सुरक्षित दिल्ली पाहिजेय -केजरीवाल

- मला ताप आहे तरी औषध घेऊन इथं आलो -केजरीवाल

- मी आणि माझे सहकारी 24 तास काम करणार -केजरीवाल

- दिल्लीला भारतातील पहिलं भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचंय -केजरीवाल

- आप पक्षाची टोपी घालून गुंडगिरी किंवा काही चुकीचं काम करत असेल तर त्याला सरळ पोलिसांच्या ताब्यात द्या-केजरीवाल

- काँग्रेस आणि भाजपचा अंहकारामुळे पराभव झाला – केजरीवाल

- मी अंहकार बाळगणार नाही, पाच वर्ष दिल्लीकरांची सेवा करणार -केजरीवाल

- मनात अंहकार बाळगू नका – केजरीवाल

- जर आपण मनात अंहकार बाळगला तर आपण आपल्या मिशनपासून दूर जाऊ शकतो – केजरीवाल

- आम्ही इथून लढणार, तिथून लढणार हे योग्य नाही – केजरीवाल

- 14 फेब्रुवारी 2014 ला आपण सरकार बरखास्त केलं होतं पण यावेळी दिल्लीकरांनी भरभरून प्रेम दिलं -केजरीवाल

- सर्व धर्मीय, श्रीमंत, गरीब आणि सर्वसामान्य जनतेनं ‘आप’ला मतदान केलं -केजरीवाल

 

- गोपाल राय यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

- सत्येंद्र जैन यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

- संदीप कुमार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

- आसिम अहमद खान यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

- मनीष सिसोदिया यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

- अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

- केजरीवाल यांनी घेतली दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

- केजरीवाल ठरले दिल्लीचे आठवे मुख्यमंत्री

- आजपासून अरविंद केजरीवाल दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री

- मी, अरविंद केजरीवाल शपथ घेतो की....

- शपथविधीला जाण्याअगोदर केजरीवाल यांनी घेतला आईचा आशीर्वाद

- रामलीला मैदानावर आपच्या कार्यकर्त्यांची एकच गर्दी

- केजरीवाल यांच्यासह सहा जण घेणार मंत्रिपदाची शपथ

  =================================================================================

असं आहे केजरीवाल सरकारचं मंत्रिमंडळ

-अरविंद केजरीवाल - मुख्यमंत्री, अर्थ आणि वीज

- मनिष सिसोदिया - उपमुख्यमंत्री, नगरविकास, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम

- गोपाल राय - वाहतूक , कामगार

- संदीप कुमार - महिला आणि बालविकास,

- सत्येंद्र जैन - आरोग्य आणि उद्योग

- जितेंद्र तोमर - कायदा

- असिम अहमद - अन्न आणि नागरी पुरवठा

Follow @ibnlokmattv

First published: February 14, 2015, 1:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading