मनीष सिसोदिया होणार दिल्लीचे उपमुख्यमंत्री?

मनीष सिसोदिया होणार दिल्लीचे उपमुख्यमंत्री?

  • Share this:

kejriwal_650__021214061612

12 फेब्रुवारी : आम आदमी पक्षाने (आप) दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर आता दिल्लीत सरकार स्थापनेला वेग आला आहे. अरविंद केजरीवाल यांचे जवळचे सहकारी मनीष सिसोदिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

'आप'ने दिल्लीत 70 जागांपैकी 67 जिंकल्या आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करण्याचे निश्चित असून, नव्या सरकारचा 14 फेब्रुवारीला शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात अरविंद केजरीवाल यांच्यासह कॅबिनेट मंत्री म्हणून मनीष सिसोदीया, सत्येंद्र कुमार जैन, आदर्श शास्त्री, जितेंद्र तोमर, संदीप कुमार आणि असीम अहमद खान यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

तर गेल्या वेळी मंत्रिमंडळात असलेले वादग्रस्त मंत्री सोमनाथ भारती, राखी बिर्ला गिरीष सोनी यांना यंदा मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2015 02:02 PM IST

ताज्या बातम्या