अखेर मांझींची पक्षातून हकालपट्टी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2015 03:12 PM IST

अखेर मांझींची पक्षातून हकालपट्टी

jeetan ram manjhi409 फेब्रुवारी : गेल्या तीन दिवसांपासून बिहारमध्ये सत्तासंघर्ष टोकाला पोहचलाय. आज या नाट्याचा पहिला अंक संपलाय. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर अडून बसलेल्या जीतन राम मांझी यांची पक्षातूनच हकालपट्टी करण्यात आलीये. मांझी यांची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे मांझी समर्थक भडकले असून हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय.

बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची अखेर संयुक्त जनता दलातून हकालपट्टी करण्यात आलीये. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला. त्यामुळे नितीशकुमार आणि मांझी यांच्यातल्या संघर्ष टोकाला पोहोचलाय. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत मांझी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीये. जेडीयूचे नेते के.सी.त्यागी यांनी ही माहिती दिली. काही वेळातच एका पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली जाईल. पण मांझींच्या समर्थकांनी याविरोधात हायकोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नितीश कुमार यांची निवड करण्यात आलीये. ते आज सर्व आमदारांना घेऊन राज्यपालांना भेटतील. आपल्या निवासस्थानापासून राजभवनापर्यंत नितीश चालत जाणार आहे. विशेष म्हणजे पक्षातून हकालपट्टी करण्याच्या अगोदर नीतिश कुमारांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केलं तर राजीनामा देऊ, असं आव्हान जीतन राम मांझी यांनी दिलं होतं. तसंच रविवारी त्यांनी पंतप्रधान नरेद्र मोदींची भेट घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार या भेटीत त्यांनी भाजपच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज थेट त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आलीये.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2015 01:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...