बुकर विजेते सलमान रश्दींची नेमाडेंवर अर्वाच्य टीका

बुकर विजेते सलमान रश्दींची नेमाडेंवर अर्वाच्य टीका

  • Share this:

Salman Rushdie sa

08 फेब्रुवारी : सुप्रसिद्ध लेखक आणि बुकर विजेते सलमान रश्दी यांनी भालचंद्र नेमाडेंच्या टीकेला खालच्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. ज्ञानपीठ जाहीर झाल्यानंतर नेमाडेंनी मुंबईत केलेल्या भाषणात सलमान रश्दी यांच्या लिखाणावर टीका केली होती, यावर रश्दींनी अर्वाच्य शब्दांत ट्विटरवरून टीका केली आहे.

नेमाडेंसारख्या वृद्ध माणसाने गुपचूप पुरस्कार स्वीकारून आभार मानावेत, अशा भाषेत रश्दींनी उत्तर दिलं आहे. नेमाडेंनी ज्या लेखनावर टीकास्त्र सोडलं आहे, ते त्यांनी वाचलं आहे की नाही याबाबतही मला शंका वाटते, असंही रश्दी म्हणतात.

भालचंद्र नेमाडेंनी भाषणात इंग्रजी ही मारक असल्याचं म्हटलं होतं. भारतात शिक्षणक्षेत्रात इंग्रजी भाषेवर बंदीचीही मागणी केली होती. तसंच रश्दी आणि व्ही. एस. नायपॉल यांच्या लेखनावर टीकास्त्र सोडलं होतं. रश्दींच्या मिडनॉईट चिल्ड्रन या पुस्तकानंतर ज्या साहित्याची निर्मिती केली, त्याला फार काही साहित्यिक मूल्य नव्हतं, असं नेमाडे म्हणाले होते. यावर रश्दींनी अर्वाच्य शब्दांत ट्विटरवरून टीका केली आहे. टीका करताना रश्दी यांनी टाईम्स ऑफ इंडियाने छापलेल्या एका बातमीची लिंकही दिली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: February 8, 2015, 11:45 AM IST

ताज्या बातम्या