मांझींची खुर्ची धोक्यात, नितीशकुमारांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2015 08:19 PM IST

मांझींची खुर्ची धोक्यात, नितीशकुमारांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा

manjhi vs nitishkumar07 फेब्रुवारी : एकीकडे दिल्लीत मतदान सुरू आहेत तर दुसरीकडे बिहारमध्ये राजकीय संकटाने गंभीर वळण घेतलंय. मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि जेडीयूचे नेते नितीशकुमार यांच्यातला सत्तासंघर्ष टोकाला पोहचलाय. त्यामुळे मांझी यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याची वेळ आलीये. तर नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. नितीशकुमार यांची सभागृहनेतेपदी निवड झाली असून मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यासाठी ते राज्यपालांची भेट घेणार आहे. तर दुसरीकडे मांझी यांनीही मोर्चेबांधणी करण्यासाठी नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे.

बिहारमध्ये जेडीयू पक्षामध्ये मतभेद चव्हाट्यावर आले. मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी आज विधानसभा बरखास्त करण्याची घोषणा केली. पण काहीवेळातच त्यांनी यू-टर्न घेतला. राज्यपालांकडे असा कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आला नाही आणि आपण राजीनामा देणार नाही असा पवित्राच मांझींनी घेतला. पण दुसरीकडे कॅबिनेटची बैठक बोलवून विधानसभा भंग करण्याचा प्रस्तावही सादर केला. मात्र, मांझी यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. गेल्या काही दिवसांपासून मांझी यांना राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात आहे. पण मांझी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आणि विधानसभा बरखास्त करण्याची शिफारसच केली. मांझी यांच्या या शिफारसीला निम्या मंत्रिमंडळाने विरोध केला. आज दुपारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नितीश कुमार यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला 97 आमदार हजर होते. नितीश कुमार यांची सभागृहनेतेपदी निवड झाल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय. विशेष म्हणजे मांझी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर नितीश कुमार यांच्याशी संगमत होत नव्हती. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी अनेक वेळा नितीश कुमार यांच्याकडे मांझी यांची तक्रारी केल्या होत्या. अखेरीस हा वाद विकोपाला गेला. आज संध्याकाळी नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2015 06:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...