केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांची उचलबांगडी

केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांची उचलबांगडी

  • Share this:

gos 05 फेब्रुवारी :  केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार मातंग सिंह यांची अटक टाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआय गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

त्यांच्या जागी सध्याचे ग्रामविकास सचिव एल. सी. गोयल यांची नेमणूक करण्यात आली आहे. गोयल हे 1979 सालच्या केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.

अनिल गोस्वामी यांनी मतंग सिंह यांची अटक रोखण्यासाठी सीबीआय अधिकार्‍यांना फोन केला होता. गोस्वामी यांनी सीबीआय अधिकार्‍यांना फोन केल्याचं कबूल केलं आहे. मात्र फोन दबाव टाकण्यासाठी नाही तर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

सरकारने यासंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला असला तरी काँग्रेसने मात्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हुकुमशहा म्हणत या गोस्वामी यांच्या हकालपट्टीचा निषेध केला आहे. गोस्वामी सरकारच्या रोषास सामोरे जाणारे तिसरे महत्त्वाचे सरकारी अधिकारी ठरले आहेत. याआधी परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांची कार्यकाळ संपण्यापूर्वी उचलबांगडी करण्यात आली होती. डीआरडीओचे प्रमुख अविनाश चंदर यांचाही अशारीतीने राजीनामा घेण्यात आला होता.

Follow @ibnlokmattv

First published: February 5, 2015, 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading