खुशखबर, पेट्रोल 2.42 तर डिझेल 2.25 रुपयांनी स्वस्त

  • Share this:

petrol_34दिल्ली (03 फेब्रुवारी) : महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा दिलासा दिलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलीये. पेट्रोल 2.45 तर डिझेल 2.25 रुपयांनी स्वस्त होणार आहे. नवी दरकपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

आंतराष्ट्रीय बाजारात दिवसेंदिवस क्रुड इंधनाच्या दरात घट होत आहे. त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर झालाय. पेट्रोलच्या दरात ही गेल्या काही महिन्यातील दहावी कपात आहे. तर डिझेलच्या दरात सहावी वेळ आहे. ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होत आहे. जून 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाचे भाव जवळपास 60 टक्क्यांनी घसरले होते. पण याच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात हवी तेवढी कपात करण्यात झाली नाही. सरकारने उत्पादन शुल्क दरात वाढ केल्यामुळे दर कपात होऊ शकलेली नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2015 06:55 PM IST

ताज्या बातम्या