घुमान साहित्य संमेलनावर प्रकाशकांचा बहिष्कार

घुमान साहित्य संमेलनावर प्रकाशकांचा बहिष्कार

  • Share this:

Sahitya-samelan

पुणे (03 फेब्रुवारी) :  घुमान येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय राज्यभरातील मराठी प्रकाशकांनी घेतला आहे. मराठी प्रकाशक परिषदेची सोमवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुमारे 250 मराठी प्रकाशकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे यंदाचे संमेलन पुस्तक प्रदर्शनाविनाच भरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

घुमानचे संमेलन जाहीर झाल्यानंतर संमेलनात पुस्तक विक्री होणार नसल्याचे सांगत प्रकाशकांनी नाराजी व्यक्त केली होती. संयोजकांनी प्रकाशकांशी चर्चा करून मध्यममार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात काहीही घडले नाही. परिषदेने दिलेल्या पत्राचे महामंडळानेही अद्याप उत्तर दिलेले नाही. महामंडळ व संमेलन आयोजकांच्या या भूमिकेमुळे प्रकाशकांनीही बहिष्काराचा निर्णय घेतला होता. त्याचंबरोबर कोणी प्रकाशकाने संमेलनात स्टॉल लावलाच तर त्याच्याशी व्यावसायिक संबंध ठेवायचे की नाही, याबाबत विचार करावा लागेल, असाही निर्णय घेण्यात आला.

स्वत:चे वेगळे ग्रंथ संमेलन

प्रकाशकांनी संमेलनात सहभागी न होता स्वतंत्र ग्रंथ संमेलन भरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील गोरेगाव येथील 'चार दिवस पुस्तकांचे' या संमेलनाने होत आहे. प्रबोधन संस्थेच्या सहकार्याने हे संमेलन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार असून, प्रख्याक गायक-संगीतकार शंकर महादेवन, अभिनेता सुबोध भावे या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या संमेलनानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभरात ग्रंथ संमेलने भरवली जाणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2015 09:09 AM IST

ताज्या बातम्या