S M L

'सॅनोरिटा, बडे बडे देशों में...'ओबामांच्या भाषणातील खास 11 मुद्दे

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2015 11:27 PM IST

'सॅनोरिटा, बडे बडे देशों में...'ओबामांच्या भाषणातील खास 11 मुद्दे

27 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍याची सुरूवात आणि सांगता शानदार अशीच झाली. दिल्लीतील सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये ओबामांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांनी एकच फटकेबाजी करून उपस्थितांनी मन जिंकली. त्यांच्या भाषणातील हे ठळक मुद्दे....

1 ) अमेरिकेच्या मार्टिन ल्यूथर किंग महात्मा गांधीजी यांच्याकडून प्रेरित आहे. ही गोष्ट दोन्ही देशांना एकत्र आणते. भारत आणि अमेरिका विविधतेनं नटलेला देश आहे. दोन्ही देशांनी याचं संगोपन आणि वाढ केली पाहिजे.

2) एकदा स्वामी विवेकानंद अमेरिकेला आले होते. ते पण माझ्या शहरात शिकागोमध्ये. त्यावेळी त्यांनी हिंदू धर्माचा संदेश दिला होता. विवेकानंद यांनी आपल्या भाषणात माझ्या बंधू आणि भगिनींनो असे म्हणत आमची मनं जिंकली, मी सुद्धा आज माझ्या भारतीय बंधू आणि भगिनींनो असंच म्हणतो.3) भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमचं सदस्यत्व मिळावं यासाठी आम्ही आग्रही आहोत.

4) हे फक्त भारत आणि अमेरिकामध्येच होऊ शकतं. अमेरिकेत एका कुक (स्वयपाकी)चा मुलगा राष्ट्रपती होऊ शकतो तर भारतात एका चहा विक्रेत्याचा मुलगा पंतप्रधान.

5) कोणताही देश महिलांंना कशी वागणूक देत यावर त्याची ओळख निर्माण होते. मी भारतात आलो तेव्हा माझं स्वागत केलं. आणि स्वागत करणारी ही एक विंग कमांडर एक महिला अधिकारी होती.

Loading...
Loading...

6) आम्ही एका अशा जगाचं स्वप्न पाहतो तिथे अणवस्त्र नसावे. आणि यात भारतानेही सहभागी असावं

7) भारतात जवळपास 30 वर्षांपेक्षा कमी असलेल्या तरुणाईची संख्या जास्त आहे. नवं जग कसं असावं याची जबाबदारी या तरुणांवर आहे.

 गेल्यावेळी भारत भेटीवर आल्यावर इथल्या काही कार्यक्रमांमध्ये मी आणि मिशेल यांनी नाचण्याचा आनंद घेतला होता, अशी आठवण सांगत यावेळी मात्र तशी संधी मिळाली नाही. 'सॅनोरिटा, बडे बडे देशों में...' मला काय म्हणायचे आहे, ते तुम्हाला कळाले असेलच, असं म्हणत खंत व्यक्त केली.

8) प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी बुलेटवरून केलेल्या चित्तथरारक कसरती विशेष आवडल्यात, मलाही बुलेटवरून फिरण्याची इच्छा होती, पण माझ्या सुरक्षारक्षकांनी तशी परवानगी दिली नाही आणि मी तसं करणारही नाही.

9) प्रजासत्ताक दिनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं हा माझा मोठा सन्मान होता...याबद्दल मी एकच म्हणले...धन्यवाद.

10) भारतात शाहरूख खान सारखा हिरो आहे, मिल्खा सिंग ऍथलिट आहे आणि याच भूमीत मेरी कॉम सारखी महिली बॉक्सर आहे. हीच भारताची सर्वात मोठी ताकद आहे आणि ही सगळी मंडळी लोकप्रिय आहे.

11) ओबामांनी आपल्या भाषणाची सुरूवात नमस्ते म्हणून केली आणि शेवट जय हिंद म्हणत केली..

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2015 08:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close