27 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौर्याचा आज अखेरचा दिवस आहे. बराक ओबामा पत्नी मिशेल यांच्यासह आज दुपारी भारतातून रवाना होईल.
बराक ओबामा आज नोबेल विजेते, सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यर्थी यांची भेट घेणार आहेत. सत्यर्थी यांना बाल हक्कांसंदर्भात कामगिरीसाठी यंदाचं शांततेचं नोबेल प्रदान केलं आहे.
सत्यर्थीची भेट घेतल्यानंतर बराक ओबामा सकाळी 10.30 वाजता सीरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात संबोधित करतील. या कार्यक्रमाला काही विद्यार्थ्यांसह दोन हजार जण उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. सीरी फोर्टमधील कार्यक्रमानंतर बराक ओबामा पत्नी मिशेल यांच्यासह सौदी अरेबियाला रवाना होणार. सौदी अरेबियाचे दिवंगत किंग अब्दुल्ला यांना ओबामा श्रद्धांजली वाहण्यासाठी ते सौदी अरेबियाला जाणार आहेत.
मन की बात साथ साथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आज रात्री 8 वाजता भारतीय नागरिकांशी रेडियोवरुन एकत्रितपणे संवाद साधणार आहेत. 'मन की बात साथ साथ' या कार्यक्रमाचं रेकोर्डिंग रविवारी हैद्राबाद हाऊसमध्ये करण्यात आलं होतं. हा विशेष कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये आज सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे.
Follow @ibnlokmattv |