S M L

गुगलची सलामी, साकारला प्रजासत्ताक दिनाचा 'डुडल'

Samruddha Bhambure | Updated On: Jan 26, 2015 01:36 PM IST

गुगलची सलामी, साकारला प्रजासत्ताक दिनाचा 'डुडल'

26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने आज (सोमवारी) देशवासियांना 'डूडल'द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. 'गुगल'च्या होमपेजवरील 'डूडल'मधून भारताच्या विविधतेतील एकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय परंपरा मांडण्याचा या डूडलद्वारे गुगलने प्रयत्न केला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर प्रत्येक राज्यांच्या संस्कृती दाखवणारे चित्ररथ सादर केले जातात. याचीच प्रतिकृती डुडलमध्ये साकारलीये. डुडलवर इंडिया गेट, राष्ट्रपती भवन आणि या दोघांमध्ये राजपथ दाखवण्यात आलंय. शिवाय राजपथाच्या चहूबाजूंना फुलांनी सजवले असून देशातील विविध राज्यातील पारंपारिक वेशभूषा परिधान करून नागरीक जल्लोष करताना दाखवले आहे.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2015 01:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close