S M L

अोबामांचं हिंदीप्रेम म्हणाले, 'नमस्ते, मेरा प्यारभरा नमस्कार'

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2015 09:12 PM IST

obama and modi Walking & Talking (14)25 जानेवारी :...'ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं' असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याबद्दल म्हणावं लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षित बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद झाली या परिषदेत ओबामांनी आपलं हिंदीप्रेम व्यक्त केलं. ओबामांनी आपल्या निवेदनाची सुरूवात 'नमस्ते, मेरा प्यारभरा नमस्कार' असं म्हणून भारतीयांची मन जिंकली.

भारताकडून मिळलेला सन्मान आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमंत्रणाबद्दल ओबामांनी सर्वप्रथम मोदींचे आभार मानले. नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व कणखर आहे. मोदींच्या ऊर्जा आणि महत्वकांक्षेमुळे मी प्रभावित झालोय अशी स्तुतीसुमनं ओबामांनी उधळली. तसंच अमेरिकेच्या दौर्‍यावर असतांना मॅडिसन स्केअरमध्ये मोदींचं बॉलिवूडच्या स्टार प्रमाणं स्वागत झालं अशी कोपरखळीही ओबामांनी लगावली. दोन्ही देशामध्ये व्यापारात 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही चांगली गोष्ट असून यापुढेही आमचं सहकार्य कायम मिळत राहिलं. कित्येक दिवसांपासून रखडेलेल्या अणुकराराच्या मुद्यावर दोन्ही देशात चर्चा झालीये. याला नव्याने चालना मिळाली असून पण आणखी चर्चा सुरू राहणार असं ओबामांनी स्पष्ट केलं. व्यवसाय,संरक्षण, नगरविकास,उत्पादन, सौरऊर्जा,अणुऊर्जा या क्षेत्रात भारतासोबत काम करणार अशी ग्वाही ओबामांनी दिली. चले साथ साथ असं म्हणत ओबामांनी आपल्या निवेदनाची सांगता केली.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2015 08:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close