वाघांच्या संख्येत चार वर्षांत 30 टक्के वाढ

वाघांच्या संख्येत चार वर्षांत 30 टक्के वाढ

  • Share this:

tigress-running

21  जानेवारी :  वन्यप्रेमींसाठी खूशखबर. गेल्या 4 वर्षांत वाघांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे. 2010मध्ये देशात 1,706 वाघ होते तर 2014 मध्ये त्यात वाढ होऊन ही संख्या 2,226 वर पोहोचली आहे. देशातील वाघांची 2014ची आकडेवारी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल (मंगळवारी) जाहीर केली.

2006 मध्ये देशातील वाघांची संख्या 1,411 वर आल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि विविध पर्यावरणवादी संस्थांनी हातात हात घालून 'वाघ वाचवा' मोहीम हाती घेतली. 2010 साली या मोहिमेला यश आले आणि वाघांची संख्या 1,706वर पोहोचली. आता यात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातही कर्नाटक नंबर एकवर आहे. या राज्यात तब्बल 406 वाघांची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ उत्तराखंड, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो. विशेष म्हणजे, जगभरात वाघांची संख्या घटत असताना भारताने मात्र यात वाढ नोंदविली आहे. जगातील 70 टक्के वाघ आता भारतात आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: January 21, 2015, 10:45 AM IST

ताज्या बातम्या