'मेसेंजर ऑफ गॉड'ला मंजुरी, सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2015 02:07 PM IST

 'मेसेंजर ऑफ गॉड'ला मंजुरी, सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Leela_Samson_1068384f

16  जानेवारी :  बाबा राम रहिम यांचा वादग्रस्त चित्रपट 'मेसेंजर ऑफ गॉड'ला 'फिल्म सर्टिफिकेशन ऍपलेट ट्रायब्युनल'ने मंजुरी दिल्यानंतर सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी रात्रीच त्यांनी बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. बोर्डाच्या सदस्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या सिनेमाला आपल्या अपरोक्ष मंजुरी मिळाल्याने त्या चांगल्याच संतापल्या आहेत.

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रहिम सिंग यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला मंजुरी देण्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, 'फिल्म सर्टिफिकेशन ऍपलेट ट्रायब्युनल'ने मंजुरी दिल्यामुळे लीला सॅमसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 'आपली या सिनेमाला परवानगी नाही. या निर्णयात आपले मत विचारात घेतलं नाही...' असा खळबळजनक आरोपही सॅमसन यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या, या चित्रपटाला मंजुरी मिळाल्याचे मी ऐकले. मला अजून लेखी स्वरूपात काहीही मिळालेले नाही. सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशनवर अविश्वास निर्माण होण्यासारखे चित्र आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय मी घेतला असून, त्यावर ठाम आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना मी राजीनाम्याबद्दल माहिती दिली आहे.

हस्तक्षेप, दबाव, पॅनल सदस्य आणि मंत्रालयाद्वारे नियुक्त केल्या जाणार्‍या व्यवस्थापन अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार यामुळे आपण पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी म्हटलं आहे.

Loading...

सॅमसन यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला एका अशा संघटनेचं व्यवस्थापन पाहावं लागत, ज्याची गेल्या नऊ महिन्यांपासून एकही बैठक झालेली नाही, कारण मंत्रालयाच्या सदस्यांकडे बैठकीला परवानगी देण्यासाठी फंड उपलब्ध नाही. सेन्सॉर बोर्डाच्या सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, पण नव्या सरकारनं नव्या बोर्डाची आणि अध्यक्षांची नियुक्त अजूनही केलेली नाही त्याशिवाय सदस्यांचा कार्यकाळ वाढवत प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काम सुरू ठेवण्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे, असं लीला सॅमसन यांनी म्हटलं आहे.

'मेसेंजर ऑफ गॉड' या सिनेमावर धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप करत अकाली तख्तसह अनेक शिख संघटनांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. बाबा राम रहिम यांच्याविरोधात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तीला चित्रपटाद्वारे मोठ केले जाऊ नये, असे शिख संघटनांचे म्हणणे आहे. दरम्यान, लीला सॅमसन यांनी या चित्रपटाला मंजुरी दिल्यामुळे राजीनामा दिल्याचे थेटपणे म्हटलेले नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2015 11:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...