मोदींना दिलासा, गुजरात दंगलीसंदर्भातील याचिका रद्द

  • Share this:

140921164627-modi-interview-01-story-top

15 जानेवारी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात 2002 च्या गुजरात दंगलीसंदर्भात न्यूयॉर्कमधील न्यायालयात सुरु असलेला खटला बंद करण्याचा आदेश न्यायधीशांनी दिले आहे. नरेंद्र मोदी हे एका देशाचे प्रमुख असल्याने त्यांना सूट मिळू शकते असे सांगत कोर्टाने हा खटला निकाली काढला.

अमेरिकेतील मानवाधिकार संघटना अमेरिका जस्टीस सेंटरने मोदींविरोधात स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2002 मध्ये झालेल्या दंगलीविरोधात ही याचिका दाखल झाली होती. मोदी हे एका देशाचे प्रमुख आहेत, त्यामुळे राजनैतिक अधिकारांतर्गंत त्यांना सूट मिळू शकते असे स्पष्टीकरण सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर दिले होते. या आधारे न्या. एनालिझा टॉरेस यांनी तीन पानी निकाल देत मोदींविरोधात सुरु असलेला खटला रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2002 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये जातीय दंगली झाल्या होत्या. या दंगलीनंतर मोदींना अमेरिकेकडून व्हिसा नाकारण्यात आला होता. पण, त्यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेने त्यांना अमेरिका दौर्‍यावर येण्याचे आमंत्रण दिले होते.

Follow @ibnlokmattv

First published: January 15, 2015, 12:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading