सुनंदा यांच्या मृत्यूला एक लेखिका कारणीभूत ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2015 07:18 PM IST

sunanda pushkar photo gallery (22)14 जानेवारी : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाला आता आणखी एक नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. सुनंदा यांचा मृत्यूला एक लेखिका कारणीभूत असल्याचं पोलीस तपासातून समोर येतंय. कॅटी नावाच्या लेखिकेमुळे थरूर दाम्पत्यामध्ये खटके उडत होते असा जबाब थरूर यांच्या यांच्या घरातला नारायण नावाच्या नोकरानं नोंदवलाय. ही कॅटी म्हणजे लेखिका कॅथरीम अब्राहम आहे, असं भाजप नेते सुब्रमण्याम स्वामी यांचं म्हणणं आहे. कॅटी ही थरूर यांच्यावर पुस्तक लिहितेय, असं थरूर यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे.

केंद्रीय माजी मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गुढ दिवसेंदिवस वाढत चाललंय. या प्रकरणाबद्दल रोज नवेनवे खुलासे होत आहे. मागील वर्षी 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये सुनंदा यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू हा विषप्रयोगाने झाला असा अहवाल डॉक्टरांनी दिलाय. मृत्यनंतर त्यांच्या मृतदेहावर 17 हून अधिक जखमाही होत्या. पण त्यांच्यावर कुणी विषप्रयोग केला याचा गुंता पोलीस सोडवत आहे. आता तर या प्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब समोर आलीये. शशी थरूर यांच्या कारकीर्दीवर कॅटी उर्फ कॅथरीम अब्राहम नावाची लेखिका पुस्तक लिहित आहे. मात्र, कॅटी यांच्यावरून थरूर आणि सुनंदा यांच्यात भांडणं होतं होती असा जबाब थरूर यांचा नोकर नारायण याने दिलाय. पोलिसांनी नोकराच्या जबाबावरून सुनंदा यांच्या मृत्यूला कॅटी कारणीभूत असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. विशेष म्हणजे सुनंदा यांचा मृत्यू होण्याअगोदर पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांचं नावही चर्चेत आलं होतं. खुद्द सुनंदा यांनी तरार आणि शशी थरूर यांचे प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता. पण तरार यांनी सुनंदा यांचे आरोप फेटाळून लावले होते. सुनंदा यांच्या आरोपानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता. तब्बल वर्षभरानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कमाली गोपनियता बाळगली होती. मागील आठवड्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि चौकशीसाठी एसआयटी स्थापन केलीये. शशी थरूर यांची चौकशीही होणार आहे. पण आता या प्रकरणी कॅथरीम अब्राहम या लेखिकेचं नाव समोर आलंय. त्यामुळे थरूर यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

सुनंदा पुष्कर यांच्या हत्येचं गूढ

  • दोन शक्यतांचा विचार करून पोलिसांकडून तपास सुरू
  • Loading...

  • खून ओळखीच्याच व्यक्तीने केला किंवा बाहेरून आलेल्या माणसाने केला.
  • सुनंदा पुष्कर घरून हॉटेलमध्ये का आल्या?
  • कुटुंबातील व्यक्ती किंवा हल्ला करायला बाहेरून आलेल्या माणसासोबतच्या झटापटीमुळे सुनंदाच्या अंगावर खुणा उमटल्या
  • पोलिसांमधल्या सूत्रांच्या माहितीनुसार किमान 2 व्यक्ती सुनंदा पुष्कर यांच्या खोलीत शिरल्या. त्यांनी पुरावे नष्ट केले आणि खोलीची सफाई केली.
  • हा खून अनोळखी व्यक्तींनी केलेला नाही.
  • सुनंदांची मानसिक स्थिती माहिती असणार्‍या व्यक्तीनेच पद्धतशीर रितीने हा खून केला.
  • सुनंदा पुष्कर यांच्याकडे आधी कोच्ची आयपीएल टीमची मालकी होती. भारतात आणि परदेशात प्रॉपर्टी होती. त्यामुळे पैशांसाठी ही हत्या झाल्याची शक्यता फेटाळण्यात येत नाही.

» सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू कोणत्या विषामुळे ?

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषप्रयोगानंच झालाय, हे आता पोलीस तपासात समोर आलंय. पण सुनंदाला मारण्यासाठी इतकं दुर्मिळ विष वापरलं गेलंय की, भारतातली एकही फॉरेन्सिक लॅब त्याचा छडा लावू शकलेली नाही. कदाचित इंग्लंड आणि अमेरिकेच्या प्रयोग शाळेतच या विषाचा छडा लागू शकेल. दरम्यान, जाणकारांच्या अंदाजानुसार या केसमध्ये पोलोनियम सारख्या दुर्मिळ विषांचा वापर केला गेला असावा, असाही एक तर्क लावला जातोय.

1. पोलोनियम- 210

- हे अत्यंत दुर्मिळ पण भयंकर विषारी किरणोत्सारी मुलद्रव्य आहे

- हेे मुलद्रव्य फक्त अणुभट्टीमध्येच तयार होतं

- याचा विषप्रयोग झाला तर मृत्यू अटळ आहे

2. थॅलियम

- सहजासहजी डिटेक्ट न होणारं विष आहे

- उंदार मारण्याचं औषध आणि कीटकनाशकांमध्ये याचा वापर होतो

3. हेरॉईन

- याचा ओव्हर डोस घेतला, तर ते जीवावरही बेतू शकतं

- याच्या ओव्हर डोसमुळे व्यक्ती कोमात जाते, नंतर मृत्यू अटळ

5. आर्सेनिक

- हा तर विषाचा राजा

- विषप्रयोगासाठी हमखास वापर होतो

6. सायनाईड

- तात्काळ मृत्यूसाठी वापरलं जाणारं विष

- सायनाईडची गोळी जीभेवर ठेवली तरी, मृत्यू होतोच

7. मर्क्युरी (पारा)

- पारा हा सायलंट किलर आहे

- पारा प्राशन केल्यानंही मृत्यू ओढवतो

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2015 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...