सुनंदा पुष्कर हत्या प्रकरण : थरूर यांच्या चौकशीबाबत दिल्ली पोलिसांचे मौन

  • Share this:

sunanda and taroor

11 जानेवारी : सुनंदा पुष्कर यांच्या हत्याप्रकरणात रविवारी माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर आपल्या नवी दिल्लीच्या निवासस्थानी पोहोचले. दिल्ली विमानतळाबाहेर असलेल्या माध्यमांच्या गर्दीमुळे थरूर यांना विमानतळातून बाहेर निघणे अवघड झाले होते, शेवटी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसाठी सीआयएसएफच्या जवानांनी थरूर यांना विमानतळातून बाहेर काढले. थरूर सध्या केरळमध्ये उपचार घेत आहेत. थरूर यांची चौकशी होणार की नाही याबाबत पोलिसांनी अजून कोणतीच माहिती दिलेली नाही. तर दुसरीकडे मला जे सांगायचं होतं, ते मी याआधीच सांगितलं आहे, अशी थरूर यांची भूमिका आहे. दरम्यान, सुंनंदांचे व्हिसेराचे नमुने इंग्लंडला पाठवायची परवानगी एसआयटीला गृह मंत्रालयाकडून मिळाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2015 06:36 PM IST

ताज्या बातम्या