राज्य काँग्रेसचा अहवाल ए. के. अँटनीकडे सोपवला

24 ऑगस्ट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतचा अहवाल दिग्विजयसिंग यांनी राज्य काँग्रेसचे प्रभारी ए. के. अँटनी यांच्याकडे सोपवला आहे. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार दिग्विजय सिंग यांनी आपल्या अहवालात महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती चांगली असून, निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकत्याचीं भावना असल्याचं म्हटलं आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जायचं कि नाही यावरुन काँग्रेसमध्ये जोरदार खलबते सुरु आहेत. राज्यातली कार्यकर्त्यांची भावना जाणून घेण्यासाठी आणि पक्ष संघटनेची स्थिती चाचपण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधीनी एक उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीचे सदस्य असलेल्या दिग्विजय सिंग यांनी आपला अहवाल शनिवारी राज्य काँग्रेसचे प्रभारी ए.के.अँटनी यांच्याकडे सोपवला.महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी 173 जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. तर दिग्विजयसिंग यांनी राष्ट्रवादी सोबत आघाडी करुन आम्हाला नुकसान झाल्याच गेल्या आठवड्यात मुंबईत म्हंटल होत.विलासराव देशमुख तर उघडउघड स्वबळावर लढण्याची भाषा करतायत. मात्र पक्षाध्यक्षा सोनिया गांधी सध्यातरी राष्ट्रवादीशी आघाडी तोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. मधला मार्ग म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीकडे आक्रमकपणे जास्त जागांची मागणी करु शकते. पण ती मागणी राष्ट्रवादीला मान्य नसल्यास, आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2009 07:14 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2009 07:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...