सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू कोणत्या विषामुळे ?

  • Share this:

sunanda pushkar photo gallery (10)07 जानेवारी : सुनंदा पुष्करचा मृत्यू हा विषप्रयोगानंच झाल्याचं एम्सच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. पण सुनंदाला मारण्यासाठी नेमकं कोणतं विष वापरण्यात आलंय. याचा अजूनही खुलासा होऊ शकलेला नाही. म्हणूनच सुनंदाला मारण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या विषाची वापर केला गेला असेल. याच विष प्रयोगासंबंधीचा हा विशेष वृत्तांत....

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषप्रयोगानंच झालाय, हे आता पोलीस तपासात समोर आलंय. पण सुनंदाला मारण्यासाठी इतकं दुर्मिळ विष वापरलं गेलंय की, भारतातली एकही फॉरेन्सिक लॅब त्याचा छडा लावू शकलेली नाही. कदाचित इंग्लंड आणि अमेरिकेच्या प्रयोग शाळेतच या विषाचा छडा लागू शकेल. दरम्यान, जाणकारांच्या अंदाजानुसार या केसमध्ये पोलोनियम सारख्या दुर्मिळ विषांचा वापर केला गेला असावा, असाही एक तर्क लावला जातोय. म्हणूनच आपण पोलोनियम आणि इतर काही कॉमन विषारी पदार्थांची माहिती जाणून घेऊयात....

1. पोलोनियम- 210

- हे अत्यंत दुर्मिळ पण भयंकर विषारी किरणोत्सारी मुलद्रव्य आहे

- हेे मुलद्रव्य फक्त अणुभट्टीमध्येच तयार होतं

- याचा विषप्रयोग झाला तर मृत्यू अटळ आहे

2. थॅलियम

- सहजासहजी डिटेक्ट न होणारं विष आहे

- उंदार मारण्याचं औषध आणि कीटकनाशकांमध्ये याचा वापर होतो

3. हेरॉईन

- याचा ओव्हर डोस घेतला, तर ते जीवावरही बेतू शकतं

- याच्या ओव्हर डोसमुळे व्यक्ती कोमात जाते, नंतर मृत्यू अटळ

5. आर्सेनिक

- हा तर विषाचा राजा

- विषप्रयोगासाठी हमखास वापर होतो

6. सायनाईड

- तात्काळ मृत्यूसाठी वापरलं जाणारं विष

- सायनाईडची गोळी जीभेवर ठेवली तरी, मृत्यू होतोच

7. मर्क्युरी (पारा)

- पारा हा सायलंट किलर आहे

- पारा प्राशन केल्यानंही मृत्यू ओढवतो

हे झाले जगभरात विषप्रयोगासाठी वापरले जाणारे घटक...पण नेमका यातला कुठला विषप्रयोग सुनंदा पुष्कर यांच्यावर झाला हे तपासानंतरच समोर येईल. पण विषप्रयोग किती भयानक असू शकतात, हे वरील घटकांचा विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2015 11:40 PM IST

ताज्या बातम्या