भारत-पाक दोस्ती बससेवा आता वाघा बॉर्डरपर्यंतच !

भारत-पाक दोस्ती बससेवा आता वाघा बॉर्डरपर्यंतच !

  • Share this:

lahore_delhi_bus4407 जानेवारी : पाकिस्तानमध्ये झालेल्या तालिबानी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान दोस्ती बस सेवा आता मर्यादीत करण्यात आलीये. अत्तारी-वाघा बॉर्डरपर्यंतच या बसेस धावणार असल्याची माहिती मिळतेय. तसंच भारतातून जाणार्‍या आणि भारतात परतणार्‍या प्रवाशांना आता सीमेवरच उतरवलं जाणार असल्याचंही कळतंय.

पाकिस्तानमध्ये मागील महिन्यात पेशावरमध्ये झालेल्या तालिबानी हल्ल्यात 134 विद्यार्थ्यांसह 150 जण ठार झाले होते. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यास सुरुवात केलीये. पाकिस्तान-भारत दोस्ती बससेवा वाघा बॉर्डरपर्यंत चालवण्यात येणार आहे. त्यामुळे नवी दिल्लीहून लाहोरला जाणार्‍या प्रवाशांना आता वाघा सीमेवर उतरावे लागणार आहे. तेथून पुढे जाण्यासाठी वेगळ्या बसने प्रवास करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे लाहोरहून दिल्लीकडे येणार्‍या प्रवाशांनाही वाघा सीमेवरच उतरावे लागणार आहे. 1999 साली पाकिस्तान आणि भारताचे संबंध सुधारावे यासाठी ही दोस्ती बस सेवा सुरू करण्यात आली होती.

Follow @ibnlokmattv

First published: January 7, 2015, 6:07 PM IST

ताज्या बातम्या