सुनंदा पुष्कर यांच्या खुनाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 7, 2015 04:24 PM IST

sunanda pushkar drug overdose_0_0_0

07 जानेवारी : माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली असल्याचं दिल्लीचे पोलीसांनी बुधवारी जाहीर केलं. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक आणि विषप्रयोगाने झाल्याच्या वैद्यकीय अहवालाचा आधार घेत दिल्ली पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.

51 वर्षांच्या सुनंदा यांचा 17 जानेवारी 2014ला एका आलिशान हॉटलमध्ये मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू अनैसर्गिक होता, असा प्राथमिक अंदाज एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी वर्तवला होता. या अहवालात फेरफार करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही त्यावेळी गुप्ता यांनी केला होता. आता दिल्ली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यामुळे डॉक्टर गुप्ता यांची भूमिका योग्य होती, असंच समोर येतंय.

सुनंदा यांनी विष स्वत:हून घेतले की त्यांना जबरदस्तीने इंजेक्शन देण्यात आले, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी सुनंदा यांच्या व्हिसेराचे नमुने आता इंग्लंड किवा अमेरिकेला पाठवण्यात येणार आहेत. पोलिसांनी अद्याप कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मात्र, या प्रकरणी शशी थरूर यांची आणि सुनंदांच्या इतर नातेवाईकांची चौकशी करू, असंही काल दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शशी थरूर सध्या केरळमध्ये आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. पण, थरूर यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा यासाठी थरूर यांच्यावर कुठलाच दबाव नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

Loading...

सुनंदा पुष्कर यांच्या हत्येचं गूढ

 • दोन शक्यतांचा विचार करून पोलिसांकडून तपास सुरू
 • खून ओळखीच्याच व्यक्तीने केला किंवा बाहेरून आलेल्या माणसाने केला.
 • सुनंदा पुष्कर घरून हॉटेलमध्ये का आल्या?
 • कुटुंबातील व्यक्ती किंवा हल्ला करायला बाहेरून आलेल्या माणसासोबतच्या झटापटीमुळे सुनंदाच्या अंगावर खुणा उमटल्या
 • पोलिसांमधल्या सूत्रांच्या माहितीनुसार किमान 2 व्यक्ती सुनंदा पुष्कर यांच्या खोलीत शिरल्या. त्यांनी पुरावे नष्ट केले आणि खोलीची सफाई केली.
 • हा खून अनोळखी व्यक्तींनी केलेला नाही.
 • सुनंदांची मानसिक स्थिती माहिती असणार्‍या व्यक्तीनेच पद्धतशीर रितीने हा खून केला.
 • सुनंदा पुष्कर यांच्याकडे आधी कोच्ची आयपीएल टीमची मालकी होती. भारतात आणि परदेशात प्रॉपर्टी होती. त्यामुळे पैशांसाठी ही हत्या झाल्याची शक्यता फेटाळण्यात येत नाही.

सीएनएन आयबीएनच्या हाती एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा महत्त्वाचा अहवाल लागलं आहे. या अहवालाच्याच आधारे दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून,  नव्याने तपास सुरू केला आहे.

काय म्हटलंय अहवालात

 • सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषप्रयोगानं झाल्याचं अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.
 • त्या आजारी नव्हत्या किंवा त्यांना कुठला रोगही झालेला नव्हता.
 • त्यांना हृदयाशी संबंधित कुठलाही आजार नव्हता किंवा हायबीपीही नव्हतं.
 • सुनंदा पुष्कर यांना टीबीही नव्हता
 • सुनंदा यांना मेंदू, फुफ्फुस, यकृत किंवा किडनीशी संबंधितही कुठला आजार नव्हता.
 • सुनंदा यांच्याजवळ अँटी-डिप्रेशन टॅबलेट्सची रिकामी पाकिटं सापडली होती. पण, त्यांच्या शरिरात या औषधांचे अंश सापडले नाही
 • मृत्यूपूर्वी सुनंदा या आराम करत होत्या, असंही एम्सच्या अहवालात म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2015 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...