सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 6, 2015 06:15 PM IST

88 sunanda pushkar06 जानेवारी : माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाला आज वेगळं वळणं मिळालं. तब्बल वर्षभरानंतर या प्रकरणी अखेर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनंदा यांचा मृत्यू विषप्रयोगानं झाल्याचं आज (मंगळवारी) दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलंय.

शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा गेल्या वर्षी 17 जानेवारीला दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरावर 12 हून अधिक जखमा होत्या. तसंच त्यांचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाला असंही व्हिसेरा रिपोर्टमधून स्पष्ट झालं होतं. अखेर वर्षभरानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तसंच या प्रकरणी याप्रकरणी आता शशी थरूर आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी वर्षभरानंतर गुन्हा दाखल केल्यामुळे शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त केलीये. सुनंदा यांच्या हत्येमागे कुणाचा हात असेल हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. जगासमोर सत्य यावं अशी आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया थरूर यांनी दिली.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 6, 2015 06:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...